digital 7/12 काडा umang app वरुण एकदम सोप्या पद्धतीने लगेच करा डाऊनलोड

 Umang App Satbara Download : 

नमस्कार शेतकरी मित्रांनो , 

lic jeevan umang तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सातबारा उतारा संदर्भातील हा महत्त्वपूर्ण अपडेट असून जर तुम्ही शेतकरी असाल, तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. आता शासनामार्फत शेतकऱ्यांना ७/१२ उतारा उमंग या अॅपवरून देखील काढता येणार आहे. महाभुलेखच्या वेबसाईटप्रमाणेच उमंग अॅपवरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा सातबारा ७/१२) डिजिटल स्वरूपात काढता येईल. उमंग अॅपवरून नक्की शेतजमिनीचा सातबारा कशाप्रकारे काढावा ? हे आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

उमंग app वरुण डिजिटल 7/12 कडता येतो एक दम सोप्या पद्धतीने एकदम किचकट न करता एक दम ओपय पद्धतीने 02 कोटी 57 लाख सातबरे डिजिटल स्वरूपात करण्यात आला आहे. त्यासाठी शेतकरी मित्राना आनंदाची बातमी आहे.

umang राज्यातील 35 जिल्ह्यातील 358 तालुक्यात 44 हजार 560 महसुली गावे असून यामध्ये जवळपास 02 कोटी 57 लाख सातबारे डिजिटल स्वरूपात करण्यात आलेले आहेत. एकंदरीत महाराष्ट्रातील शेत जमिनीच्या सातबाराचा विचार केला, तर 99% पेक्षा जास्त सातबारा उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. महसूल विभागाकडून विकसित करण्यात आलेल्या महाभुमी या वेबसाईटवरसुद्धा शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा डाऊनलोड करता येतो; परंतु ही प्रक्रिया शेतकऱ्यांना किचकट व गुंतागुंतीचे वाटते, त्यामुळे कधी कधी प्रयत्न करून सुद्धा शेतकऱ्यांना सातबारा डाऊनलोड करता येत नाही.

umang शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि नजीकचा जर कोणता दाखला असेल, तर तो म्हणजे त्यांच्या शेतजमिनीचा सातबारा होय. पूर्वी शेतकऱ्यांना शेतजमिनीचा सातबारा (७/१२) मिळवण्यासाठी तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असेत हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना सातबारा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याची सुविधा राज्यात सुरू करण्यात आली. त्यासाठी महाभुलेख हा नवीन पोर्टल शासनाकडून विकसित करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा सहज व सोप्या पद्धतीने जवळील सीएससी केंद्रावर किंवा महा ई-सेवा केंद्रावर उपलब्ध होऊ लागला.

lic jeevan umangशेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन शासनाकडून आता उमंग या शासकीय अॅपच्या मदतीने सातबारा डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्याप्रमाणे यापूर्वी नागरिक महाभुलेख पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल सातबारा डाऊनलोड करत होते, त्याचप्रमाणे उमंग अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सातबारा डाऊनलोड करता येणार आहे. उमंग अॅपवरून नक्की कशाप्रकारे तुमच्या सातबारा PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता, यासाठी वरील लिंकवर क्लिक करून माहिती पहा.

उमंग अॅपवरून सातबारा असा डाऊनलोड करा !

Umang App Saat Bara Download Process in Marathi : शासनाकडूनच्या नवीन सुविधांमध्ये जर तुम्हाला उमंग अॅपवरून तुमच्या शेतजमिनीचा सातबारा डाऊनलोड करायचा असेल, तर तुम्हाला खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी लागेल.

सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवरून शासकीय उमंग अॅप डाऊनलोड करा.

ॲप डाऊनलोड केल्यानंतर उमंग अॅप उघडा, त्यानंतर तुम्ही जर नवीन असाल, तर त्याठिकाणी तुमची नोंदणी करून घ्या.

e नोंदणी करताना तुमचा मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार कार्ड इत्यादी माहिती टाकावी लागेल, त्यानंतर तुमचा युजर आयडी, पासवर्ड म्हणजेच लॉगिन तयार होईल.

• सर्व प्रक्रिया पूर्ण करून लॉगिन केल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डला Services हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

• त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शेतजमिनीचा सातबारा डाऊनलोड (७/१२) करण्यासाठीचा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.

• आता सर्वप्रथम तुमचं राज्य निवडा त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव अश्याप्रकारे अनुक्रमे पर्याय निवडल्यानंतर आता तुमचा सातबारा क्रमांक किंवा गट क्रमांक टाका.

• डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला 15 रु. पेमेंट ऑनलाईन पद्धतीने कराव लागणार आहे, त्यासाठी तुम्ही पहिलेच तुमच्या उमंग वॉलेटमध्ये रक्कम जमा करून ठेवू शकता.

अशा पद्धतीने उमंग अॅपच्या माध्यमातून तुम्ही फक्त 05 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर तुमच्या शेतजमिनीचा सातबारा डाउनलोड करू शकता. सातबारा डिजिटल स्वरूपातील असल्यामुळे या सातबाऱ्यावर कोणत्याही अधिकाऱ्याची सही अथवा शिक्याची आवश्यकता भासत नाही, त्याचप्रमाणे हा सातबारा शेतकरी कोणत्याही शासकीय कामासाठी वापरू शकतात.

Leave a comment